रिंकू राजगुरू मराठीतील सर्वात महागडी अभिनेत्री, मानधनात जबरदस्त वाढ

195

सामना ऑनलाईन । मुंबई

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हि मराठी चित्रपटसृष्टीतील महागडी अभिनेत्री ठरली आहे. रिंकूने मराठीतील टॉपच्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांना मागे टाकत तिच्या आगामी चित्रपटासाठी घसघशीत मानधन घेतले आहे. रिंकूला तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’ साठी 27 लाख रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे समजते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

रिंकूचा पहिला चित्रपट सैराटने हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड तोडले. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी रिंकूचा कागर हा चित्रपट आला. या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाची चांगलीच वाहवाह झाली. त्यामुळे रिंकूचा चित्रपटसृष्टीतील भाव चांगलाच वधारला आहे.

रिंकूच्या मेकअप या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटात रिंकू एका गावाकडील तरुणीची भूमिका साकारत आहे. मात्र टीझरमध्ये ती दारूची बाटली हातात घेऊन काहीतरी बडबडताना दिसतेय.

आपली प्रतिक्रिया द्या