
सामना ऑनलाईन । सिडनी
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे त्यांच्या खेळापेक्षा मैदानावरील भांडणं आणि स्लेजिंगसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानसोबत सुरू असलेल्या मॅचमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा स्लेजिंगचा घाणेरडा खेळ पाहायला मिळत आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने शुक्रवारी मैदानावर रिषभ पंत याला टार्गेट केले होते. मी माझ्या पत्नीसोबत सिनेमाला जाईन तेव्हा तु माझ्या घरी येऊन माझ्या मुलांना सांभाळशील का? असा फालतू सवाल त्यावेळी पेनने रिषभ पंतला केला. रिषभ पंतने त्यावेळी संयम बाळगत त्याला काहीच उत्तर दिले नाही मात्र शनिवारी जेव्हा टिम पेन फलंदाजीसाठी मैदानावर आला त्यावेळी पंतने त्याला तडाखेबंद उत्तर देत त्याचे तोंड बंद केले.
Tim Paine doing some recruiting for the @HurricanesBBL out in the middle of the ‘G… #AUSvIND pic.twitter.com/6btRZA3KI7
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2018
शुक्रवारी हिंदुस्थानची फलंदाजी सुरू असताना रिषभ पंतला चितवण्यासाठी यष्टीच्या मागे उभा असलेला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक व कर्णधार टीम पेनने रिषभला बडबडण्यास सुरुवात केली. ‘धोनीचे संघात पुनरागमन झालंय आता तुला बाहेर बसावं लागलं. त्यामुळे तुला काम नाही. आता या मुलाला हरिकेंसला पाठवलं पाहिजे. खूप सुंदर शहर आहे. तु तुझ्या सुट्ट्या तिथे घालव. किंवा तु आता माझ्या घरी ये आणि मी जेव्हा माझ्या बायकोसोबत चित्रपटाला डिनरला जाईन तेव्हा माझ्या मुलांना सांभाळ’, अशा शब्दात त्याने पंतची खिल्ली उडवली. मात्र त्यावर पंतने जराही प्रत्युत्तर न देता शांतपणे खेळत राहिला.
WATCH: Bring on the banter!
Aussie skipper Tim #Paine yesterday engaged in some good verbal with @RishabPant777.
Now it’s the Indian keeper’s turn to give some lip back!#AUSvIND pic.twitter.com/j2114q5ABP
— Herald Sun Sport (@heraldsunsport) December 29, 2018
दरम्यान आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर आला त्यावेळी पंतने पेनला चांगलेच प्रत्युत्तर दिले. त्याने पेनला टेम्पररी कॅप्टन देखील म्हटले ‘मैदानावर एक नवीन पाहुणा आला आहे. मयांक तु कधी टेम्पररी कॅप्टनविषयी ऐकलंयस का? जाडेजा याला आऊट करण्यासाठी तुला फार मेहनत घ्यावी लागणार नाही. कारण याला फक्त बडबड करायला येते’ असे यावेळी पंतने पेनला सुनावले.


























































