
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अवाच्या सवा झाल्या आहेत. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने प्रवासासह अन्य काही गोष्टी महाग झाल्या आहेत. आता घाऊक महागाई चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.
मे महिन्यात घाऊक महागाई 9.68 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. याआधी एप्रिल महिन्यात महागाई 8.26 टक्के होती. मे महिन्यातील महागाई दर हा 43 महिन्यांत सर्वाधिक आहे. वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि इंधनाच्या किंमती वाढल्याने घाऊक महागाई वाढली आहे. दरम्यान, किरकोळ महागाई वाढून 3.93 टक्क्यांवर पोहोचली आहे.




























































