कुडाळ शहरात रस्ता कामाचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक 12 हिंदू कॉलनी मधील अथर्व प्लाझा ते राऊळ घर रस्ता कार्पेट कामाचा शुभारंभ गुरूवारी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या तेली यांच्या उपस्थितीत स्थानिक रहिवासी अणावकर सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

उपनगराध्यक्षा सौ.सायली मांजरेकर, आरोग्य सभापती सौ.साक्षी सावंत, नगरसेवक सुनील बांदेकर, गणेश भोगटे, राकेश कांदे, नगरसेविका सौ.संध्या तेरसे, सौ.अश्विनी गावडे, ठेकेदार नंदू तावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.