
हिंदुस्थानच्या रोहन बोपन्नाने डच देशाच्या माटेव मिडेलकूपच्या साथीने फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत प्रथमच पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली. बोपन्ना-माटेव जोडी ऐतिहासिक जेतेपदापासून आता दोन पावले दूर आहे. बोपन्ना-माटेव जोडीने संघर्षपूर्ण उपांत्यपूर्व लढतीत ब्रिटनचा लॉयड ग्लासपूल व फिनलॅण्डचा हेन्री हेलियोवारा या जोडीचा 4-6, 6-4, 7-6 (10/3) असा पराभव केला. ही लढत दोन तास चार मिनिटांपर्यंत रंगली.
























































