
अमेरिकेतील एका पॉर्नस्टारने 20 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं आहे. त्याच्यावर या प्रकरणी खटला भरण्यात आला असून त्याला 330 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण
हे प्रकरण लॉस एन्जेलिस इथलं आहे. रॉन जेरेमी असं या 67 वर्षीय पॉर्नस्टारचं नाव आहे. रॉनवर बुधवारी बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. जेरेमीने जून महिन्यात तीन महिलांवर बलात्कार केले. तसंच 2014 मधील एका लैंगिक शोषण प्रकरणातही तो दोषी आढळला आहे.
त्याच्यावर 15 ते 54 वयोगटातील अनेक महिलांनी बलात्काराचे आरोप केले आहेत. जून महिन्यातील तीन महिलांखेरीज त्याच्याविरुद्ध 17 जणींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
दोषी आढळल्यास होऊ शकते जन्मठेप
रॉनने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आतापर्यंत त्याच्यावर 11 बलात्कार, 8 लैंगिक शोषण आणि 16 इतर लैंगिक गुन्ह्यांसाठी आरोप करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये तो दोषी आढळला तर त्याला 330 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाची सुनावणी डिसेंबर महिन्यात होणार आहे.
























































