रोनाल्डो-मेस्सी आमने सामने, चॅम्पियन्स लीग स्पर्धेची गटवारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील दोन सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो व लियोनेल मेस्सी पुन्हा एकदा आमने – सामने येणार आहेत. चॅम्पियन्स लीग या युरोपमधील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेची गटवारी गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आली. यावेळी लियोनेल मेस्सीचा बार्सिलोना तर ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा युवेण्टस हा संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे दोन दिग्गज फुटबॉलपटूंमधील द्वंद्व समस्त फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. जी गटामध्ये या दोन संघांसह युक्रेनचा डायनामोव किव व हंगेरीचा फेरेनवारोस या दोन संघांचा समावेश आहे.

चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील गटवारी
गट अ – बायर्न म्युनिच, ऍटलेटीको माद्रिद, साल्झबर्ग, लोकोमोटीव मॉस्को
गट ब – रियाल माद्रिद, एस डोनेत्स्क, इंटर मिलान, बोरूसीया एम.
गट क – पोर्टो, मँचेस्टर सिटी, ऑलिम्पियाकोस, मार्सेल
गट ड – लिव्हरपूल, एजाक्स, अटलांटा, मिडझिलँड
गट इ – सेव्हीला, चेल्सी, क्रॅसनोदार, रेनेस
गट फ – झेनीत, बोरूसीया डॉर्टमंड, लॅझीयो, क्लब ब्रुग
गट जी – युवेण्टस, बार्सिलोना, डायनामोव किव, फेरेनवारोस
गट एच – पीएसजी, मँचेस्टर युनायटेड, आरबी लिपझीग,इस्तांबुल बसाकसेहीर

20 ऑक्टोबरपासून साखळी फेरींना सुरूवात
20 ऑक्टोबरपासून चॅम्पियन्स लीगच्या साखळी फेरीच्या लढतींना सुरुवात होणार आहे. आठ आठवड्यांमध्ये सहा फेऱ्या होणार आहेत. 29 मे रोजी इस्तांबुल येथे फायनल लढत रंगेल. चॅम्पियन्स लीग व युरोपा लीगमधील लढतींसाठी 30 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.