लडाखमध्ये हुल्लडबाजांना दोन लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात स्टंटबाजी करणे काही पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पँगॉन्ग तलाव आणि वन्यजीव क्षेत्रांमध्ये नियम मोडल्याबद्दल प्रशासनाने त्यांना थेट तुरुंगाची हवा दाखवण्यासोबतच प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. लडाखमध्ये अशा प्रकारची कडक कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. हुल्लडबाजीची गंभीर दखल घेत लडाख प्रशासनाने पहिल्यांदाच अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. त्यांच्या चारही गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.