
बंगाली रंगभूमीवरील लिजेंड अभिनेत्री बिनोदिनी दासी यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ‘नटी बिनोदिनी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा ही बिनोदिनी यांची भूमिका साकारणार आहे.
दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी त्यांच्या बहुचर्चित बायोपिक ‘बिनोदिनी एकटी नटीर उपाख्यान’मधील मुख्य कलाकारांची घोषणा केली. चित्रपटाच्या टीझर पोस्टरचे नुकतेच अनावरण झाले. त्यामध्ये रुक्मिणी मैत्रा या श्री चैतन्य महाप्रभू यांच्या भूमिकेत दिसत आहेत. बिनोदिनी दासी यांनी श्री चैतन्य महाप्रभू यांची व्यक्तिरेखा रंगभूमीवर साकारली होती.
रुक्मिणी गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहेत. ती शास्त्रीय नृत्यही शिकली.


























































