कोरोना लस घेतल्यास मिळणार 10 लाखांची कार मोफत, ‘या’ शहरांमध्ये मिळत आहे ही ऑफर..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आजारावरील लसीकरण मोहिम जगभरात राबवली जात आहे. लोकांनीही पुढे येऊन लस घ्यावी म्हणून जगभरात वेगवेगळ्या मोहीम राबवल्या जात आहेत. अशातच रशियाने लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी एक वेगळी योजना आणली आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना लसीकरण मोहिम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. लोक स्वतः होऊन पुढे येऊन लस घेत नाही आहे. अशा परिस्थितीत मॉस्कोच्या महापौरांनी एक आगळीवेगळी ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, जो स्वतः होऊन पुढे येऊन कोरोनाची लस घेणार, त्याला 10 लाख रुपयांपर्यंतची नवीन कार बक्षीस म्हणून दिली जाईल.

मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यनिन आहेत. गेल्या काही दिवसांत देशात कोरोना लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. असं केल्यास लसीकरणाचे प्रमाण वाढेल अशी त्यांना आशा असल्याचे ते म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, 14 जूनपासून 18 व त्यापेक्षा अधिक वय असलेले लोक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेणार्‍या लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेणे आवश्यक असेल. ही योजना फक्त 11 जुलैपर्यंत लागू असणार आहे.

लकी ड्रॉमधून 20 लोकांची नावे काढली जातील

सर्व लोकांना कार देण्यात येणार नसल्याचे सेर्गेई सोब्यनिन यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विजेत्यांची नावे लकी ड्रॉमधून काढली जातील. लकी ड्रॉमधून निवड झालेल्या 20 लोकांना 20 कार मोफत दिली जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.