
लोअर परळ येथील उत्कर्ष सेवा मंडळ ही संस्था गेली 19 वर्षे राज्यस्तरीय ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करत आहे. या स्पर्धेला राज्यभरातून महाविद्यालये आणि संस्था यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दैनिक ‘सामना’ स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या 3 ते 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत दादर क्लब, लोकमान्य टिळक कॉलनी, 3 री गल्ली, दादर रेल्वे स्थानकाजवळ, दादर पूर्व येथे होणार आहे. ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 9 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, भायखळा पूर्व येथे संपन्न होणार आहे.




























































