बीड ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डनिहाय शिवसेना शाखाप्रमुखांची नियुक्ती – सचिन मुळूक

21


सामना प्रतिनिधी, बीड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात वार्डनिहाय शाखा प्रमुख नेमून या महत्वकांक्षी उपक्रमाचा अहवाल उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त भेट करण्याचा निर्धार जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केला आहे. माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र या उपक्रमात शिवसेना वाढीचा प्रयत्न यशस्वी केला जाणार आहे .

जिल्ह्यातील ग्रामपंचायमध्यगे वार्डनिहाय शाखा प्रमुखाची नेमणूक केल्यामुळे गावपातळीवरील शिवसेनेचे जाळे निश्चितच वाढणार आहे. हा महत्त्वकांक्षी उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ अर्थात ‘भगवा पंधरवडा’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे. दरम्यान, वॉर्डनिहाय शाखा प्रमुख नेमणूक केल्यानंतर गावपातळीवर शिवसेनेचा पक्ष विस्तार होणार आहे.

वॉर्डनिहाय शाखा प्रमुख नेमणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात अंबाजोगाई, केज, परळी, वडवणी, धारुर व माजलगाव येथील तालुकाप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. मागील 10 दिवसापासून सर्व तालुक्यात प्रत्येक गावात ग्रामपंचायत वॉर्डनिहाय शाखा प्रमुख नेमणुकीला सुरुवात झाली असून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाख शिवसेना शाखा प्रमुखांची नियुक्ती करन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाची अनोखी भेट देण्यात येणार आहे. नेमलेल्या सर्व शाखा प्रमुखांना शिवसेना भवन मुंबई येथून पक्षाच्या ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या