
पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय सदु शिंदे क्रिकेट लीग स्पर्धेत पुणे पोलिसांच्या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत सन इलेव्हन संघाने पुणे शहर पोलीस क्रिकेट टीमचा दोन गडी राखून पराभव केला. दरम्यान, स्व. सदु शिंदे क्रिकेट लीग मानाच्या स्पर्धेत सलग दुसर्या वर्षी पुणे शहर पोलीस दलाने अंतिम सामन्यात मजल मारली. या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व खेळाडुंचा विशेष सन्मान केला. यावेळी सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
स्व. सदु शिंदे क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये 42 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात पुणे पोलिस क्रिकेट संघाने 40 षटकात सन इलेव्हनला 187 धावांचे आव्हान दिले होते. त्यानुसार शेवटच्या षटकात सन इलेव्हन संघाने आघाडी घेत दोन गडी राखून पोलीस टीमवर विजय मिळविला. सामन्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः सहभाग घेउन खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेसह नियमित कामकाजावर लक्ष ठेऊन टीममधील पोलिस अधिकार्यानी आणि कर्मचार्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले आहे. पोलीस टीममधील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक नंदकुमार कदम, विश्वजित तारु, शिवाजी दबडे, आरिफ शेख, विपुन गायकवाड, अमित बोडरे, अमरनाथ लोणकर, प्रशांत गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, तेजस भोसले, अंकुश दिघे, महेश राठोड, अमोल पायगुडे, अमर साळवे, रविंद्र गोलाने, स्वप्नील कांबळे, आश्विन कुमकर, अश्वजित सोनवणे, अजिंक्य गायकवाड, निलेश कुलथे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.































































