बिग बॉस’फेम सई लोकूरने केला साखरपुडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सई लोकूर हिला आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. सईने शुक्रवारी साखरपुडा केला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने साखरपुड्याचे फोटो शेअर केले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तीन – चार दिवसांपूर्वीच सईने आपल्या जोडीदाराचा पाठमोरा फोटो शेयर केला होता. तेव्हापासून सईचा जोडीदार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर आज या सस्पेन्सवरून पडदा हटला आहे. तिर्थदीप रॉय असे तिच्या जोडीदाराचे नाव आहे. मात्र तिर्थदीप कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे हे अद्याप समजू शकले नाही. बिग बॉसपूर्वी सईने मिशन चॅम्पियन आणि कपिल शर्माची मुख्य भूमिका असलेल्या किस किस को प्यार करू या चित्रपटात काम केले होते.