एका महिन्यात आरोपपत्र दाखल करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार व तिच्या मृत्युप्रकरणी एका महिन्यात आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करा आणि उद्यापासून तातडीने याप्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून  खटल्याची तयारी करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

साकीनाका येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ  पोलीस अधिकाऱयांची तातडीने बैठक बोलावली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना पोलिसांना केल्या.

या प्रकरणातील आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणेकरून पुढे पुणी अशी हिंमत करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले.

महिलेला तातडीने रुग्णालयात नेले

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी तसेच पोलीस तपासाविषयी जाणून घेतले. या घटनेबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले आणि पुठेही वेळ दवडला नाही. तातडीने संशयिताला पकडल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

या बैठकीला मुख्य सचिव सीताराम पुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुपुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक  संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे,  सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.

 खटला जलदगती न्यायालयात

हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल असे पाहून पिडीत दुर्दैवी महिलेस न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुरावे व्यवस्थित जमा करा

या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय , इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच पुठेही कमतरता राहणार नाही हे पाहावे.  न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता त्वरित विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून काम सुरू करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

  • महिलांची वर्दळ असलेल्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी.
  • महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो असे शहरातील हॉटस्पॉट निश्चित करून तेथे गस्त वाढवा.
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱयाचा समावेश असलेले ‘निर्भया’ पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस-रात्र वेळोवेळी भेटी द्याव्या.
  •  स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराधार व एकटय़ा महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे.
  • महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर लक्ष ठेवावे.
  • गुह्याची उकल होण्यातील सीसीटीव्हीचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने पॅमेरे बसवा.

मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा कायम ठेवा

  मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे  ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरोपींना फाशीच झाली पाहिजे

या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विद्यमान कायद्यातदेखील कठोर तरतुदी आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घ्यावी आणि जलदगती न्यायालयाची मागणी करावी, असेही फडणवीस म्हणाले.

घटना मन विषण्ण करणारी

राज्यात महिला अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली.  ‘शक्ती’ कायदा आणण्याच्या बाबतीत सरकारने अक्षम्य दिरंगाई दाखवली.   भविष्यात अशा घटना घडू नयेत, महिला अत्याचार रोखले जावेत, अत्याचाऱयांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी एक पृती आराखडा तयार करून सरकारने महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडावा, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

मनोधैर्य योजनेतून मदत

या घटनेतील पीडित महिलेल्या पुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत करणार असल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री अॅड. यशोमती ठापूर यांनी दिली. मुंबईपाठोपाठ अमरावतीमध्येही महिला अत्याचाराची घटना घडली आहे. समाजातील विपृत लोकांवर नक्की कठोरपणे कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.