बहुप्रतिक्षित राधे चित्रपटाबाबत सलमानची मोठी घोषणा; एकाचवेळी मल्टीफॉर्मेटमध्ये प्रदर्शित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलमान खानच्या राधे चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाबाबत सलमानने मोठी घोषणा केली आहे. हा चित्रपट 13 मे रोजी जगातील थिएटरसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाचदिवशी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी मल्टीफॉर्मेटमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला बिग बजेट चित्रपट ठरणार आहे. सलमान खानने ट्व्िटरच्या माध्यमातून याबाबतची घोषणा केली आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचे सावट असल्यामुळे  मनोरंजन क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, सलमान खानने चाहत्यांना दिलेला शब्द पाळला आहे. ईदच्या रिलीजची परंपरा लक्षात घेत सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओजचा प्रभू देवा दिग्दर्शित ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट 13 मे ला व्यापक स्तरावर प्रदर्शित होत असल्याची घोषणा सलमानने केली आहे.

झीप्लेक्सवरील ‘पे पर व्ह्यू’ मॉडेल व्यतिरिक्त सर्व डीटीएच चॅनेलवरील प्रेक्षकांना उपलब्ध असेल जिथे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी ठराविक रक्कम मोजावी लागेल. ‘राधे’ चित्रपटाचे ओटीटी हक्क झी5 कडे आहेत. ‘पे पर व्ह्यू’ मॉडेलवर झीप्लेक्स आणि सर्व डीटीएच चॅनेलवर एकाच वेळी प्रसारित केला जाईल जिथे प्रत्येक दर्शकाला चित्रपट पाहण्यासाठी काही रक्कम मोजावी लागेल आणि त्यानंतरच चित्रपट बघता येणार आहे. तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहता येणार आहे. याखेरीज जिथे देश-विदेशात सिनेमागृह सुरू झाली आहेत, तिथे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत 13 मे रोजी चित्रपटगृहात ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर उद्या गुरुवारी रिलीज होणार आहे.