संभाजीनगर येथे दासनवमी उत्सवाचे आयोजन, सलग 11 दिवस धार्मिक कार्यक्रम

संभाजीनगर येथे श्रीसमर्थ राम मंदिर, समर्थनगर येथे दासनवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. 6 ते 16 फेब्रुवारीदरम्यान सलग 11 दिवस प्रवचन, कीर्तन, भजन, महाप्रसाद आदीं कार्यक्रम होणार आहे. याबाबत श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी माहिती दिली.

दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 6 ते 7 भूपाळ्या काकड आरती, 7 ते 8 श्रींचा अभिषेक व पूजा, सकाळी 8 ते 11 शहरांत विविध भागांत दोन पथकाच्या माध्यमातून भिक्षा फेरी, सकाळी 9 ते 12 ग्रंथराज दासबोध सामूहिक पारायण, सायंकाळी 4:30 ते 5:30 दैनंदिन उपासना, 5:30 ते 7 कीर्तन प्रवचन आदी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.

यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस चिटणीस ऍड. नरेंद्र देव, कोषाध्यक्ष दीपक तांदळसकर, उपाध्यक्ष मयूर कोटणीस, विश्वस्त सचिन जोशी, उल्हास कुलकर्णी, माणिक रत्नपारखी, संजय मांडे आदी उपस्थित होते.