
कोरोनाबाधित महिलेने बाथरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मिरज शासकीय कोविड रुग्णालयात सोमवारी पहाटे घडली आहे.
सुमन गणेश कुंभार (वय 42, रा. सुभाषनगर, हुळ्ळे प्लॉट) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमन कुंभार या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर गेले महिनाभर उपचार सुरू होते. 13 मे रोजी त्यांना मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोना झाल्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडली होती. दोन दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. त्यांना डिस्चार्ज देण्याचे नियोजन सुरू असताना त्यांनी बाथरूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.





























































