
आत्मचिंतनाला प्रवृत्त करणाऱ्या सकाळच्या रागांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच. या उत्साहपूर्ण रचनांचा आस्वाद रसिकांना घेता यावा यासाठी 17 मार्च रोजी उदयस्वर, पंचम निषाद आणि पृथ्वी थिएटर्सतर्फे सकाळी 7.30 वाजता ही दुर्मिळ मैफल आयोजित केली आहे. ध्वनिक्षेपकाशिवाय असलेल्या या बैठकीची जादू यावेळी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक डॉ. एम. राजम यांच्या कलेचा आनंद या मैफलीत संगीतप्रेमींना घेता येईल. सांगीतिक कुटुंबात जन्मलेल्या डॉ. एन. राजम यांनी त्यांच्या वडिलांकडून कर्नाटक संगीताचे धडे घेतले. देशातील संगीतप्रेमींमध्ये आज त्यांचे नाव गाणारे व्हायोलिन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सर्वात मानाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.



























































