
ट्रेनमध्ये झोपलेल्या तरुणीच्या तोंडासमोर हस्तमैथुन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे वय 47 वर्ष असून तो सांगलीचा रहिवासी आहे. पीडितेचे वय 22 वर्षे असून ती ट्रेनमध्ये झोपलेली असताना दत्तात्रय चव्हाण नावाचा आरोपी तिच्या तोंडासमोर हस्तमैथुन करत होता. हा प्रकार मंगळवारी सकाळी सुमारेस 7.30 च्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकातील गोकर्ण स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. गोव्याचे रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी सदर प्रकाराबाबत बोलताना म्हटले की पीडिता झोपलेली असताना आरोपी तिच्याजवळ आला आणि तो अश्लील चाळे करू लागला होता.
चव्हाण तरुणीच्या तोंडासमोर हस्तमैथुन करत असल्याचे पाहून तरुणीच्या सोबत असलेल्या दोन तरुणांनी पाहिले होते. त्यांनी तत्काळ रेल्वेमध्ये आपात्कालीन स्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी दिलेल्या नंबरवर फोन करून पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनीझटपट कारवाई करत चव्हाण याला अटक केली आहे. चव्हाण हा केरळमधील कन्नूर इथे काम करतो. पोलीस निरीक्षक गुडलर यांनी या प्रकाराबाबत बोलताना सांगितले की तरुणी आणि तिचे दोन मित्र असे तिघेजण पूर्णा एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. हे तिघेही जण सिनेमॅटोग्राफी क्षेत्रात असून व्हिडीओ शूटींगसाठी ते केरळहून गोव्याला चालले होते. पीडिता ही केरळमधील कोझिकोड जिल्ह्याची रहिवासी आहे.




























































