आई-बहिणीच्या मृत्यूमुळे निराश होऊन तरुणाने विष पिऊन केली आत्महत्या

संगमेश्‍वर तालुक्यात एका तरुणाने आई-बहिणीच्या मृत्यूमुळे निराश होऊन विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत गंगाराम गार्डी असे मयत तरुणाचे नाव आहे. विष प्राशन केल्यानंतर तरुणाला तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत याची बहिण कुंदा हिचा आकरा दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर चार दिवसांनी त्याची आई इंदिरा ही देखील मरण पावली होती. या सर्वांमुळे तो निराश होऊन त्याची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. यातूनच त्याने घरात ठेवलेले गवतावर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याला उलट्या होवू लागल्याने त्याच्या घरच्यांनी व शेजार्‍यांनी त्याला आधी देवरूख येथे आणि नंतर रत्नागिरी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या