
परभणीमध्ये यापूर्वी कधीच गद्दार टिकला नाही. जो-जो खासदार गद्दार झाला, तो खासदार कायमचा घरी बसला. त्याचे राजकरण संपले. म्हणूनच म्हणतात देशात परभणी आणि जगात जर्मनी. या परभणीमध्ये अनेक आंडू-पांडू-बंडू आले आणि गेले. तरीही शिवसेना इथे मजबुतीने उभी आहे. हा स्वत:ला काय म्हणतो बंडू द बॉस, परंतु हा आहे XXX द बॉस, अशा शब्दात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी गद्दार खासदार संजय जाधव यांचा समाचार घेतला.
संजय राऊत म्हणाले, हा परभणीचा गद्दार माणूस दोनवेळा आमदार झाला. तीनवेळा खासदार झाला. जवळजवळ 20 वर्षे हा माणूस सत्तेत आहे आणि विकासाच्या गप्पा हा करतो. साधी पिठाची गिरणीसुद्धा याने आणली नाही. अरे तू काय विकास करणार, असा खडा सवालही त्यांनी केला.नरेंद्र मोदी आणि भाजपलासुद्धा मागील 12 वर्षांत विकास सापडला नाही. आणि हा काय करणार आहे. पत्र्याच्या घरात राहणारा हा साधा शिवसैनिक, आता 2 हजार कोटींचा मालक असल्याचे लोक मला सांगत आहेत. शिवसेना या चार अक्षराने व ठाकरे कुटुंबाने दिलेली ही ताकत आहे. याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.
मारेकऱ्यांच्या गोटात गेलात, लाज वाटली पाहिजे
धाराशीवचा भामटा खासदार व्हावा म्हणून शिवसैनिकांनी मेहनत केली, प्राणांचं बलिदान दिलं. भूम तालुक्यातील पाठसांगवी गावातील समाधान पाटील या शिवसैनिकाची मिंधे गटातील लोकांनी हत्या केली. आणि हा खासदार मारेकऱ्यांच्या गोटात जाऊन बसला, लाज वाटली पाहिजे, अशी तोफ संजय राऊत यांनी गद्दार ओम निंबाळकर यांच्यावर डागली. तो भामटा म्हणतो मी विकासासाठी गेलो, दोनवेळा खासदार, एक वेळा आमदार काय विकास केला? वडिलांच्या नावाने असलेल्या संस्थेत शेतकऱयांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला, त्याची ईडी चौकशी लागली म्हणून तो मिंधे गटात केला, असा हल्ला संजय राऊत यांनी केला.



























































