
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या वैभवी रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा मान यावर्षी येथील ग्रामस्थ भोसले घराण्यास मिळाला आहे. या निमित्ताने कर्नाटक राज्यातून निपाणी तालुक्यातील राजापूर गावातून सर्जा राजाची बैलजोडी राजुशेठ गिरी यांच्या कडून 4 लाख रुपये देऊन आळंदी ग्रामस्थ तुळशीराम भोसले, रोहित भोसले यांनी खरेदी केली.
यावेळी पै. शिवाजी रानवडे, माजी नगरसेवक सागर भोसले, संतोष भोसले, पांडुरंग भोसले, संजय भोसले, प्रकाशशेठ घुंडरे, तुकाराम वहिले,सादु आप्पा कुऱ्हाडे, मारुती घुंडरे, मनोजशेठ भापकर, शैलेश रानवडे, पप्पू थोरवे, प्रसाद जोशी, गणेश भोसले, सार्थक कुऱ्हाडे, चैतन्य भोर, निखिल भोसले, स्वयंम भोसले, रुद्र भोसले, तन्मय भोसले, क्षितिज भोसले, श्रेयश भोसले, निलेश घुंडरे, बाळासाहेब घुंडरे, पंडित महाराज बानूले, रुपेश खोल्लम आदी उपस्थित होते.



























































