‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधून प्रेक्षकांना याचा अंदाज आलाच असेल की मैत्री, फ्लर्टिंग, प्रेम, लग्न हे जर आयुष्यात असेल तर आयुष्य एक रोलर कोस्टर राइड होऊन जाते. या चित्रपटात सिद्धार्थ जाधवने बाब्याची आणि सौरभ गोखलेने समीरची भूमिका साकारली आहे.


समीरच्या आयुष्यात येणार्‍या मुलींची भूमिका संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल या अभिनेत्रींनी साकारली आहे. महेश मांजरेकर यांनी साकारलेले गडबडे बाबा पात्रं लोकप्रिय होणार यात शंका नाही. कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे यांनीही चित्रपटाची रंगत वाढवली आहे. हा चित्रपट 1 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.