‘ओटीटी’वर सत्यजित पाध्ये यांचा ‘बिरजू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ‘ओटीटी’वर अनेक वेबसीरिज येत आहेत. अॅमेझॉन प्राईमवर ‘ब्रीद इनटू द शाडोज’ याचा दुसरा सीजन नुकताच प्रदर्शित झाला. यात बिरजू नावाचा बोलका बाहुला आपल्याला बघायला मिळतो. हे पात्र  शब्दभ्रमकार रामदास पाध्ये व त्यांचा मुलगा सत्यजित पाध्ये यांनी घडवलं आहे. ओटीटीवर पहिल्यांदाच ही बोलक्या बाहुल्यांची कला आपल्याला बघायला मिळते.

सत्यजित पाध्ये यांनी प्रसिद्ध अभिनेता मंत्रमुग्ध यालाही शब्दभ्रमाची कला शिकवली. तो या वेबसीरिजमध्ये आंधळ्या शब्दभ्रमकाराची भूमिका साकारत आहे. नवीन पिढीला या कलेची ओळख होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, असे सत्यजित म्हणाले. ‘ब्रीद इनटू द शाडोज’ या वेबसीरिजमध्ये अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत आहे. दिग्दर्शन   मयांक शर्मा यांचे आहे.