भेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आरवली

संगमेश्वर तालुक्यातील भेलसई गंग धाडवेवाडी या ठिकाणी ५ वी पर्यंत शाळा असून जुनी वर्गखोली मोडकळीस आली होती. गंग धाडवेवाडी ग्रामस्थांनी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची भेट घेवून नवीन वर्गखोली मंजुर करण्याची विनंती केली होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार सहदेव बेटकर भेलसई गंग धाडवेवाडी शाळा इमारत मंजुर केली. त्यांनी मंजुर केलेल्या इमारतीचे भूमिपूजन दि.१५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

भेलसई गावात २१ वाड्या असून जि.प मालकीच्या ६ जि.प शाळा अस्तित्वात आहेत ६ शाळांपैकी फौजदारवाडी व धाडवेवाडी दोन्ही शाळांना शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी भेटी देवून स्थानिक ग्रामस्थांशी समस्यांसदर्भात संवाद साधला धाडवेवाडीला वर्गखोली मंजुर केली आहे तर फौजदार वाडीला आपण दोन वर्गखोल्या मंजुर करत असल्याची घोषणा शिक्षण शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी यावेळी केली.

सहदेब बेटकर यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून विकास संकल्पना मांडली आहे. सहदेव बेटकर साहेब यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामे होत आहेत. त्यांनी मांडलेल्या संकल्पनेतला विकास आमच्या गावात होईल. त्यांच्या विचारांमधून आलेल्या विकासात्मक धोरणांचा आमच्या भेलसई गावाला निश्चितच लाभ होईल, असे मनोगत भाषणादरम्यान मनोज पवार यांनी व्यक्त केले.

भेलसई धाडवेवाडी जि.प शाळा इमारत भूमिपूजन प्रसंगी जि.प शिक्षण व अर्थ समिती सभापती सहदेव बेटकर, संगमेश्वर पंचायत समिती माजी सभापती कृष्णा हरेकर,सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटोळे, भेलसई सरपंच दिक्षा धाडवे, उपसरपंच आनंद कदम, माजी सरपंच एकनाथ कदम,ग्रा.पं सदस्य प्रमोद कदम, ग्रा.पं सदस्या वैशाली कारले, सपना गोरीवले, शितल म्हाळींग, शाखाप्रमुख अंकुश कदम, ग्रामस्थ आत्माराम कदम, लक्ष्मण कदम, शंकर रहाटे, मनोज पवार, विजय थोरे, मिलींद धाडवे, प्रताप सावंत, चंद्रकांत धाडवे, सुभाष हुमणे आदी उपस्थित होते.