
सामना प्रतिनिधी । गुडसूर
येथील प्रशाला गुडसूरला ४ डिसेंबर २०१८ रोजी १०० वर्षे झाल्यामुळे वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांच्या उपस्थितीत केक कापून व फटाके फोडून अतिशय उत्साही वातावरणात शाळेचा १०० वा वाढदिवस साजरा केला. प्रास्ताविकात शाळेची यशोगाथा सविस्तरपणे मांडण्यात आली. याप्रसंगी हे वर्षे शतकमहोत्सवी म्हणून विविध कार्यक्रम वर्षभर घेऊन साजरा करण्याचे ठरले.




























































