
सामना ऑनलाईन । जम्मू
जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी संपूर्ण जम्मू कश्मीरमध्ये कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र हे कलम 370 रद्द होऊन दोन दिवस उलटल्यानंतर सरकारने जम्मू मधील जमावबंदी हटविली आहे. मात्र अद्याप खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा खंडीतच ठेवण्यात आली आहे.
Sushma Chauhan, Deputy Magistrate (DM) Jammu District: Section 144 (gathering of more than 4 people banned) withdrawn from Jammu Municipal limits. All school, and colleges to open tomorrow (August 10). pic.twitter.com/EezNKkIKpu
— ANI (@ANI) August 9, 2019
जम्मू कश्मीरच्या जिल्हा आयुक्त सुषमा चौहान यांनी जम्मूतील कलम 144 हटविल्याची माहिती दिली. तसेच जम्मूतील शाळा कॉलेज देखील आज शनिवार पासून सुरू होणार आहेत. उधमपूर जिल्ह्यात शुक्रवारपासूनच शाळा सुरू झाल्या आहेत. जम्मू व्यतिरिक्त कठुआ, उधमपूर, सांबा जिल्ह्यातून देखील जमावबंदी हटविण्यात आली आहे.



























































