
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई शेअरबाजारात नव्या आर्थिक नववर्षाच्या सुरुवातीलाच जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला असून सेन्सेक्सने 39 हजाराची ऐतिहासिक उसळी घेतली आहे. निर्देशांकाने घेतलेली ही झेप बघता मुंबई शेअर बाजार 40 हजाराचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Sensex touches all time high, crosses 39,000 mark. It is currently at 39,007.95, up by +335.04 points. pic.twitter.com/SBNqkF7dmn
— ANI (@ANI) April 1, 2019
आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात झाली त्याच वेळी निर्देशांक 185.97 अंकांनी वधारून 38,858.88 इतका झाला. तर निफ्टीही 41.3 अंकांची उसळी पाहायला मिळाली. 11,665.20 वर निफ्टीच्या कामकाजाला सुरुवात झाली. आर्थिक विकासाला चालना मिळावी या करता रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात हा उत्साह पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आतंरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती सुधारली आहे. त्याचाही परिणाम पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी 10:18 च्या सुमारास 335 अंकांची झेप घेत निर्देशांक 39,000 हजारावर जाऊन पोहोचला. तर निफ्टीही 11,700 अंकांवर पोहोचला. याआधी 9 ऑगस्ट 2018 रोजी निर्देशांकाने पहिल्यांदा 38 हजाराचा टप्पा गाठला होता.


























































