विकास पाटील साकारणार स्वामीसुत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत आता नवी गोष्ट सुरू होणार आहे. स्वामी समर्थ यांच्या दिव्यतेचा अनुभव सगळ्यांनी प्रत्यक्षात अनुभवले असे नाही. पण, मालिकेत स्वामीसुत पर्वाचा आरंभ होणार आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेत विकास पाटील स्वामीसुत साकारणार आहे.

त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘हे खूप महत्त्वाचे पात्र आहे. कारण स्वामींनी त्यांना आपला मानसपुत्र मानले होते. तुम्हाला मालिकेत बघताना कळेलच कसा त्यांना स्वामींवर विश्वास नव्हता, पण हळूहळू स्वामींनी त्यांना आपल्या जवळ घेतलं आणि कशाप्रकारे त्यांचं आयुष्य बदलून गेलं. मी खूपच उत्सुक आहे या भूमिकेबद्दल, कारण मी स्वतः स्वामीभक्त आहे आणि मला इतपं महत्त्वाचं पात्र करण्याची संधी मिळाली आहे हीच मी भाग्याची गोष्ट मानतो.’