नोकराकडून मालकिणीची हत्या; पळून जाताना नोकराचाही मृत्यू

1626
murder-knife

उत्तर गोव्यातील हडफडे येथे वृद्ध नोकराने आपल्या वृद्ध मालकिणीचा डोक्यात लोखंडी पाईप मारून खून केला. खून करून पळून जाताना पडल्याने गंभीर जखमी झाल्याने नंतर त्याचाही मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शिरीन मोदी ही 65 वर्षीय वृद्ध महिला मूळ मुंबईची असून गेल्या 20 ते 22 वर्षांपासून ती कुटुंबीयांसोबत वेगसवाडा- हडफडे येथे राहत होती. त्यांचेकडे प्रफुल्ल जना (65) हा मूळ ओरिसा वृद्ध बागकाम करणारा नोकर म्हणून गेल्या 3 वर्षांपासून काम करीत होता. तो मोदी यांच्या घरापासून जवळच भाडय़ाच्या घरात राहत होता. रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास शिरीन मोदी व प्रफुल्ल जना यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले. सकाळी झालेल्या भांडणांनंतर संतापाच्या भरात प्रफुल्लने रागाच्या भरात घराबाहेर पडलेला लोखंडी पाईप उचलून शिरीन मोदी यांच्या डोक्यात मारला आणि तो तेथून पळून गेला.

प्रफुल्लने केलेल्या हल्ल्यात शिरीन मोदी या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान प्रफुल्ल जना हा शिरीनवर खुनी हल्ला करून पळून जात असताना रस्त्यावरच पडून जखमी झाला. रस्त्यावरून जाणाऱया लोकांनी 108 रुग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी प्रफुल्ल मृत झाल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या