
सामना ऑनलाईन पंढरपूर
राज्यभरातून निघालेला वैष्णवांचा पालखी सोहळा हरिनामाचा नामघोष करीत मोठ्या उत्साहाने सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. आषाढी वारीची जय्यत तयारी झाली असल्याचा दावा नगरपरिषदेने केला असला तरी तो दावा किती फोल निघाला आहे. चंद्रभागा नदी तीरावरील उद्धव घाट आहे या घाटाच्या वरच्या भागातील ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने या ड्रेनेज मधील मैलमिश्रित पाणी या उद्धव घाटावरून नदीच्या पात्रात जात आहे.
चंद्रभागा नदी तीरावरील तीन प्रमुख घाटापैकी हा एक घाट आहे. श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणारे भाविक याच घाटावरून वाळवंटात उतरतात. नेमकं याचं घाटावरील ड्रेनेज फुटल्याने संपूर्ण उद्धव घाटावर मैला मिश्रित पाणी वाहते आहे. नाईलाजाने याच दुर्घंधीयुक्त पाण्यातून वारकरी भाविकांना चंद्रभागेच्या स्नानासाठी जावे लागते आहे. गेल्या आठवडाभरात नदीतीरावरील बहुतांश ड्रेनेज मधून मोठ्यांप्रमाणात पाणी वाहत होते, जिल्हा व नगर परिषद प्रशासन वारीची जय्यत तयारी झाली असल्याचा दावा करत असताना हा दावा फोल झाल्याचे दिसून येत आहे.


























































