
शिवडीकरांना गोलंदजी हिल जलाशयातून कमी दाबाने होणाऱया पाणीपुरवठय़ाचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटला आहे. महापालिका अभियंत्यांनी शिवडी बस डेपो येथील जलवाहिनीच्या म्ख्यु झडपेच्या दुरुस्तीचे काम अहोरात्र करून शिवडीकरांचा पाणीपुरवठा सुरळीत केला. एफ-दक्षिण विभागातील जल अभियंत्यांच्या या कामाची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिवडी येथील प्रभाग क्रमांक 206 मध्ये मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत होता. यासाठी मुंबई महापालिकेच्या एफ-दक्षिण जल विभागाच्या अधिकाऱयांसोबत पाहणी करण्यात आली. यावेळी गोलंदजी हिल जलाशयामध्ये पाणी कमी जमा होत असल्यामुळे त्यातून पुढे शिवडीकरांनाही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिनीचे काम करण्याचे ठरले. पालिकेच्या एफ-दक्षिण अभियंत्यांकडून शिवडी बस डेपो येथे जलवाहिनीच्या मुख्य झडपेचे काम दिवसरात्र केल्यामुळेच गोलंदजी हिल जलाशयाच्या पाणीसाठय़ात वाढ झाली. त्यामुळे शिवडीकरांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सहायक अभियंता शैलेंद्र सोनटक्के, दुय्यम अभियंता अभिजित देसाई आणि कनिष्ठ अभियंता योगेश काsंडगेकर यांनी मेहनत घेतली. त्यांच्या या कामाची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, नगरसेवक सचिन पडवळ, महापालिकेचे मुख्य जल अभियंता अजय राठोर, एफ-दक्षिण विभागातील अधिकारी, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे आदी उपस्थित होते.



























































