
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
मीटूची मोहीम थंडावली आहे असं वाटत असतानाच एका महिला पत्रकाराने इंडिया टुडे या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक गौरव सावंत याच्यावर लैंकिग छळाचा आरोप केला आहे. विद्या कृष्णन असं या महिला पत्रकाराचे नाव आहे. एका बातमीच्या वृत्तांकनासाठी बिआस येथे गेली असताना माझ्यावर गौरव सावंतने लैंगिक अत्याचार केल्याचं विद्या हिने कॅराव्हॅन या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
Gaurav Sawant told Krishnan that what he had in mind was “nothing naughty.” He just wanted to get into a bathtub with her. @nikita1712 in: https://t.co/7GYj4U5CJK #MeToo #TimesUp
— The Caravan (@thecaravanindia) November 12, 2018
सदर घटना ही २००३ साली झाल्याचं विद्या हिने म्हटले आहे. हिंदुस्थानी लष्कराने बिआस इथल्या सैनिकी तळाबाबत माहिती देण्यासाठी एक दौरा आयोजित केला होता. लष्कराने पत्रकांसाठी विशेष जीपची व्यवस्था केली होती. या जीपमध्ये बसल्यापासून सावंत याने आपला छळ करायला सुरूवात केल्याचं विद्याने म्हटलं आहे. सुरुवातीला त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर हळूहळू तो खाली येत गेला असं विद्याने त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना सांगितलं आहे.
ज्या ठिकाणी लष्कराने पत्रकारांच्या राहण्याची व्यवस्था केली होती तिथे पोहचल्यानंतर सगळ्या पत्रकारांना त्यांच्या खोल्या देण्यात आल्या. खोलीत शिरल्यानंतर गौरव सावंतने मला तुझ्यासोबत बाथटममध्ये आंघोळ करायची आहे असा संदेश पाठवला. त्यानंतर त्याने तिला मला तुझ्या खोलीत यायचं आहे असा संदेश पाठवला. नकार दिल्यानंतरही आपल्या खोलीचा दरवाजा वाजला असं विद्याने म्हटलं आहे. दरवाजा उघडताच गौरव सावंत आतमध्ये घुसला आणि त्याने काही घडलंच नाही अशा आविर्भावात वावरायला सुरुवात केली. विद्याने या मुलाखतीत म्हटलंय की खोलीत आल्यानंतर काही मिनिटांनी गौरव सावंतने पँटची चेन उघडली आणि अश्लील वर्तन करायला सुरुवात केली. विद्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केल्याने गौरव सावंत तिथून निघून गेला असंही या मुलाखतीत लिहलं आहे. गौरव सावंत याने ट्विटरचा आधार घेत आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे असल्याचं म्हणत आपण याबाबत कायदेशीर सल्ला घेत असल्याचं सांगितलं आहे.
The article published by Caravan is irresponsible, baseless, and completely false. I am talking to my lawyers and will take full legal action. So grateful to my family, friends, and viewers for their support.
— GAURAV C SAWANT (@gauravcsawant) November 12, 2018

























































