
बॉलीवुडचा किंग अभिनेता शाहरुख खान याने आज शिर्डी येथे साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतल .यावेळी त्याने साईबाबांच्या पाद्यपुजेचा व आरतीचा देखील लाभ घेतला.
शाहरुख सोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील होती. चाहत्यांच्या गराड्यात मोठी कसरत करत साईमंदिर सुरक्षा रक्षकांनी शाहरुखला मंदिरापर्यत पोहचवलं. दरम्यान शाहरूख खानने साई समाधीवर निळी शाल अर्पण केली. डंकी चित्रपटाचे पोस्टर यावेळी साईचरणी अर्पण करत शाहरुख खानने चित्रपटाच्या यशासाठी साकड घातलं आहे.
View this post on Instagram
डंकी चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय त्या अगोदर शाहरूख खानने वैष्णोदेवीच आणि आज साईबाबांचे दर्शन घेतले..डंकी चित्रपटात ‘किंग खान’ शिवाय विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी, सतीश शहा आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणीने दिग्दर्शित केलाय. डंकी’ हा चित्रपट 120 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला .
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, प्रशासकिय अधिकारी राजतिलक बागवे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी शाल, श्रींची मूर्ती व श्री साई सतचरित्र देऊन सत्कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी राजतिलक बागवे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.






























































