शालीन भनोटची एक्स वाईफ दलजीत कौर करणार लग्न, परदेशात होणार स्थायिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस 16 चा स्पर्धक शालीन भनोट हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. शालीनचे अभिनेत्री दलजीत कौरसोबत लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या चार वर्षातच दलजीत व शालीनचा घटस्फोट झाला. दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केलेला. या दोघांना एक मुलगाही आहे.

शालीनने कायम त्याच्या या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे. त्याने बिग बॉसच्या घरातही कधी त्याच्या व दलजीतच्या नात्याबद्दल चकार शब्द काढला नाही. दरम्यान दलजीतने अनेकदा त्याला सोशल मीडियावरून सपोर्ट केला. मात्र सोबतच दलजितने ती व शालीन मित्र नसल्याचेही स्पष्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान दोन आठवड्यांपूर्वी सलमान खानने दलजित लग्न करणार असल्याचे शालीनला सांगितले होते. अखेर आज दलजितने देखील तिने साखरपुडा केल्याचे सांगितले आहे. दलजितने 3 जानेवारीला नेपाळ येथे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या निखील पटेलसोबत साखरपुडा केला असून ती मार्चमध्ये त्याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यानंतर ती कायमची लंडनला स्थायिक होणार आहे. ती स्वत:सोबत मुलाला देखील घेऊन जाणार आहे. ही गोष्ट अद्याप शालीनला माहित नसल्याचे समजते.