गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी कृत्रिम तळयात केले गणेश विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृह व वित्तराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सातारा नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपूरक असे पारंपारिक गणेशमुर्तीचे विसर्जन करुन राज्यातील जनतेनेही यंदा व यापुढेही कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक गणेशमुर्तींचे विर्सजन करावे, असा संदेश दिला आहे. यावेळी यशराज देसाई उपस्थित होते.

सातारा येथे नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपूरक असे पारंपारिक गणेशमुर्तीचे विसर्जन करताना गृह व वित्तराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आमच्या घरातल्या गणरायाचं प्रथेप्रमाणे गौरी ज्या दिवशी जातात त्या दिवशी विसर्जन होत असते. त्याप्रमाणे घरगुती पध्दतीने मी माझ्या घरातल्या गणरायाचे परीवारासह सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या गणेश विसर्जनाच्या कृत्रीम हौदामध्ये विसर्जन केले आहे.

गणेश चतुर्थीपासून घरातले सर्व पूजाविधी परिवाराने मिळून एकत्र पार पाडले. गेल्या वर्षापासून कोरेानाचा संसर्ग असल्यामुळे खुप मोठे कार्यक्रम कुणालाच करता आले नाहीत. मात्र, तरीही परंपरेप्रमाणे आपण सगळयांनी आपआपल्या घरी हा गणेशोत्सव साजरा केला आहे. आपण सातारा नगरपालिकेने गणेशमुर्ती विर्सजनाकरीता जे कृत्रिम तळयाच नियोजन केले आहे त्याठिकाणी माझे घरच्या गणेशमुर्तीचे पर्यावरणपुरक विर्सजन केले आहे.