मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कला प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरमधील मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कला प्रदर्शन प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, 6 मे रोजी ‘कलाक्षेत्रातील क्रिएटीव्ह करीअर’ या विषयावर शशिकांत गवळी यांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून ते मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून ते 7 मे पर्यंत सुरू राहणार आहे.