
सामना ऑनलाईन । लखनौ
भाजपला राम राम ठोकून काँग्रेस प्रवेशासाठी सज्ज झालेले शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा देखील निवडणूक लढवणार असल्याचे समजते. पूनम या समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असून सपाकडून त्यांना राजनाथ सिंह यांच्याविरोधात लखनौमधून तिकीट देण्यात येणार आहे. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसने देखील समर्थन दिले आहे.
सपा बसपाने अद्याप लखनौ सीटवरील त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघातून भाजपने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे सपा-बसपा या मतदारसंघासाठी भाजपला काँटे की टक्कर देईल असा उमेदवार शोधत होते. शत्रुघ्न सिन्हांची मुलगी व प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला सपाने लखनौमधून तिकीट देण्याची योजना आखली होती. मात्र त्यांची योजना बारगळल्याने त्यांनी पूनम सिन्हा तिकीट देण्याचे ठरवले असल्याचे समजते.
























































