एकतरी पत्रकार परिषद घ्या मोदीजी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आता तरी एखादी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सामोरे जावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंडखोर भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज ट्विटरवरून दिले.

मोदीजी, पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत एकही पत्रकार परिषद न घेतलेले हिंदुस्थानचे एकमेव पंतप्रधान अशी तुमच्या नावाची नोंद इतिहासात झालेली आहे, असा टोलाही शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला आहे.

मोदी यांनी आपल्या कार्यकालाच्या अखेरच्या आठवडय़ात, महिन्यात उत्तर प्रदेशसहित इतरत्र 150 योजनांची घोषणा केली. आचारसंहितेचा तो भंग नसला तरी ‘जुमलेबाजी’ निश्चितच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.