VIDEO : मैदानात सर्वांदेखत फाटली ‘या’ क्रिकेटपटूची पँट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ख्राईस्टचर्च

माजी क्रिकेटपटू शॉन पॉलक याला मैदानावर कॉमेंट्री करत असताना कॅच पकडायला जाणे चांगलेच महागात पडले आहे. पॉलक कॅच पकडत असताना त्याची पँट फाटली. त्यावेळी पॉलकची झालेली फजिती बघून मैदानावर उपस्थित असलेल्यांना हसू आवरले नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शॉनने देखील त्याच्या झालेल्या या फजितीवर एक मेजशीर ट्विट करत स्वत:चीच खिल्ली उडवली आहे.

सेंच्युरियन मैदानावर न्यूझिलंड व श्रीलंकेमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये शॉन पॉलक ग्रॅमी स्मिथ व शॉन पॉलक मैदानावर येऊन लाईव्ह कॉमेंट्री करत होते. यावेळी शॉन व स्मिथला स्लिपमध्ये उभं राहून कॅच पकडतात तशी कॅच पकडण्याचा टास्क देण्यात आला. मात्र जशी पॉलकने कॅच पकडली त्याचवेळी त्याची पँट फाटली. त्याची झालेली फजिती बघून कॉमेंटेटर्स, प्रेक्षक सर्वच हसून हसून लोट पोट झाले.