बिकीनीतला फोटो टाक! पोलिसाच्या मागणीने संतापली अभिनेत्री

सोशल मीडिया हे अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या चाहत्यांशी, प्रेक्षकांशी जोडून ठेवण्याचं एक उत्तम माध्यम आहे. मात्र, या माध्यमाचा गैरफायदा बऱ्याचदा घेतला जातो. त्याचा त्रास महिला वर्गाला विशेषतः अभिनेत्रींना होतो.

नुकताच त्याचा प्रत्यय एका अभिनेत्रीला आला आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आक्षेपार्ह अशी कमेंट करण्यात आली आहे. गंभीर म्हणजे ही कमेंट एका पोलीस कर्मचाऱ्यानेच केली आहे.

या अभिनेत्रीचं नाव शिखा सिंग असं आहे. कुमकुम भाग्य नावाच्या मालिकेतून लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिने जवळपास तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला होता. त्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या होत्या.

पण, त्यातली एक कमेंट आक्षेपार्ह होती. जगदीश गुंजे नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शिखाकडे या कमेंटमधून बिकीनी आणि मायक्रो मिनीमधील फोटोची मागणी केली होती. ती कमेंट वाचून अभिनेत्री संतापली.

तिने त्याच्या कमेंटसह त्याच्या प्रोफाईलचा फोटो शेअर केला. तुम्ही एखाद्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून तुम्ही त्याला शिवीगाळ करावी हे चूक आहे. एखाद्याचा अपमान करणारे शब्द वापरून तुम्ही पळून जाऊ शकणार नाही जगदीश गुंजे, तुम्हाला लाज वाटायला हवी, अशा शब्दांत तिने त्याचा समाचार घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या