शिखर धवनचा 9 वर्षांचा सुखी संसार मोडला, पत्नी आयेशापासून घेतला घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा ‘गब्बर’ खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) याने पत्नी आयेशा मुखर्जी (Aesha Mukerji) हिला घटस्फोट दिला आहे. आयेशा मुखर्जी हिनेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. मात्र शिखर धवन याने यावर अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांनी 2012 मध्ये विवाह केला होता. आयेशा शिखरहून 10 वर्षांनी मोठी होती आणि तिचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुलीही होत्या. मात्र शिखरने या दोन्ही मुलींचाही स्वीकार केला होता. यानंतर 2014 ला दोघांना जोरावर नावाचा मुलगाही झाला. मात्र आता 9 वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

आयेशाने इन्स्टाग्राम अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, जोपर्यंत माझा दोन वेळा घटस्फोट झाला नव्हता तोपर्यंत मला वाटत होते की हा वाईट शब्द आहे. हे खूपच हात्स्यास्पद आहे. माझा पहिल्यांदा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला वाटले मी स्वार्थी आहे, कारण मी माझ्या पालकांना निराश केले होते. त्याचबरोबर मुलांनाही मी काहीही देऊ शकत नव्हते. तसेच मी देवाचाही अपमान केला असेही वाटले. तेव्हा माझ्यासाठी घटस्फोट हा वाईट शब्द होता. त्यामुळे दुसऱ्यांदा विवाह केल्यानंतर मी सर्वस्व पणाला वालले, मला काही तरी सिद्ध करायचे होते. परंतु आता माझा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे. हे आणखी भयानक आहे.

दरम्यान, आयेशा मुखर्जी हिची पोस्ट व्हायरल होत आहे. यावर शिखर धवन याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिखरच्या प्रतिक्रियेनंतरच हे नक्की घडलंय का? आणि का घडलं? याचा खुलासा होईल.