मिंधे गट-भाजपतला वाद विकोपाला; रामदास कदमांच्या पुतळ्याला भाजपने हाणले जोडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीतील मिंधे गट आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. मिंधे गटाचे रामदास कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील संघर्ष थोबडवाथोबडवीपर्यंत आला आहे. त्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांचा निषेध करताना रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे हाणले.

मिंधे गटाचे रामदास कदम यांनी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनीही रामदास कदम यांना चोख उत्तर देत थोबाड फोडीन, अशी थेट धमकी दिली. या त्यांच्या वक्तव्याने दोघांमधील वाद थोबडवाथोबडवीपर्यंत पोहचला. भाजपने रत्नागिरी जिल्ह्यात रामदास कदमांविरोधात निदर्शने केली. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूरात निदर्शने केली. संगमेश्वर येथे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे हाणले.

विधानसभा निवडणूकीत वाद पेटणार
मिंधे गटाच्या रामदास कदमांच्या बेताल वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीत दापोली विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात या वादाचे पडसाद उमटणार आहेत.