आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शेळ्या व शिलाई मशीनचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. कितीही अडचण आली तर आमची आठवण काढा अशी साद आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना घातली. तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे जय भवानी महिला सुतगिरणीचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर त्याच ठिकाणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दुष्काळ निवारण शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला संबोधीत करताना आदित्य ठाकरे यांनी या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा मराठवाडा दौरा करत असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते परभणी विधानसभा मतदार संघात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी शेळ्यांचे व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. तसेच 100 विद्यार्थ्यांना ट्रॅकसुटचे व प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.