कल्याणच्या ऐतिहासिक भटाळे तलावाचे अस्तित्व कायम राहणार

27

सामना ऑनलाईन । कल्याण

लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता ऐतिहासिक भटाळे तलावाचे अस्तित्व मिटवण्यास निघालेल्या पालिका अधिकाऱयांना राज्य शासनाने चांगलीच वेसण घातली आहे. भटाळे तलाव बुजकून त्यावर वाहनतळ, मैदान आणि बगीचाचे आरक्षण प्रशासनाने टाकले होते. मात्र शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे राज्य शासनाने हे आरक्षण रद्द केले आहे. तसे आदेशच पालिकेला दिले आहेत.

पालिका प्रशासनाने भटाळे तलावाचे अस्तित्कच मिटविण्याचा घाट घालत 1996 च्या विकास आराखडय़ात या तलावावर चक्क मैदान, बगीचा आणि वाहनतळाचे आरक्षण टाकल्याने हा तलाव पालिकेच्या लेखी विस्मरणातच गेला होता. मात्र शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक सचिन बासरे यांनी 2008 साली या आरक्षणाला आक्षेप घेत हे आरक्षण बदलून तलावाचे अस्तित्क जपण्याची मागणी करणारा प्रस्ताव महासभेत मांडला होता. महासभेने हा प्रस्ताव मंजूर करत हा अशासकीय प्रस्ताव शासकीय करण्यासाठी शासनाकडे धाडला होता. मागील 10 कर्षांपासून हे आरक्षण बदलण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर याला यश आले असून शासनाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. विकास आराखडय़ातील आरक्षणे हटवून तलावाचे आरक्षण कायम ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नामशेष होत जाणारा हा तलाव शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आपले मूळ अस्तित्व कायम राखणार आहे.

तलावाला अतिक्रमणाचा विळखा
पुराचे पाणी कल्याण शहरात शिरू नये यासाठी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी भटाळे तलाकाची रचना करण्यात आली होती. मात्र सध्या शहराच्या प्रवेशद्वारावर विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या भटाळे तलावाचे संरक्षण आणि सुशोभिकरण करण्याचा प्रशासनाला विसर पडल्याने तलाकात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तलावातच तबेल्याचे बेकायदा बांधकाम झाले आहे. शिवाय भूमाफियांनीही तलावाच्या बाजूने अतिक्रमण सुरू केले आहे. पाणवनस्पतींनी तलावाला पुरते ग्रासले आहे. आता सर्व अतिक्रमणे हटकून पालिकेने तलावाचे सुशोभिकरण तत्काळ सुरू कराकवे, अशी मागणी सचिन बासरे, नगरसेकक सुधीर बासरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या