
‘नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यावेळी सभागृहात पहिल्यांदाच निवडून आलेले अनेक आमदार आहेत आणि शपथ घेताना अभिमान वाटत होता. आम्ही सर्व मिळून राज्यातील जनतेची सेवा करणार आहोत’, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. विधिमंडळाच्या सभागृहात आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी पत्रकारांनी गराडा घातला. आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
Aaditya Thackeray,Shiv Sena: We are committed to making a new Maharashtra. There are several first time MLAs and we all felt proud while taking oath. Want to serve the people of the state pic.twitter.com/1zBNLvaAOe
— ANI (@ANI) November 27, 2019
महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाबद्दल त्यांनी जनतेचे आभार देखील मानले. तसेच शिवसेने सोबतच्या पक्षांच्या नेत्यांचे आभारही मानले. ‘निवडणुकांनंतर आता शेतकऱ्यांचे, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे. त्यासाठी सर्वपक्ष मिळून विधानसभेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू’, असंही ते म्हणाले.



























































