शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. राणे कुटुंबाविरोधात बोलल्याने अज्ञाताने फोन करून आपल्याला धमकी दिली असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांना दिली.

आज सकाळी साडेअकरा ते बारा या वेळेत आपल्याला दोन वेगवेगळ्या नंबरवर फोन आले. आम्ही अनेक लोकांना मारून समुद्रात फेकून दिले आहे. त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. तुम्ही मुंबईत आल्यानंतरही तुमचाही तसाच समाचार घेऊ अशी धमकी दिल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले. दरम्यान धमकी देणाऱयाला देशमुख यांनीही आव्हान दिले आहे. मी मंगळवारी मुंबईत येत असून तुम्ही नारायण राणे आणि नितेश राणेंना घेऊन रात्री आठ-दहा दरम्यान नरिमन पॉईंट येथे या असे धमकी देणाऱयाला बजावले आहे. त्यानुसार मी उद्या मुंबईला जाणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.