
माझ्या आमदार फंडातून ग्रामपंचायतींनी कामे केली. त्या त्या ग्रामपंचायतींना एसीबीकडून नोटीसा दिल्या जात आहेत. त्यातून माझ्यावर दबाव आणण्याचा ते वेळोवेळी प्रयत्न करताहेत. मात्र या एसीबीच्या चौकशीच्या पाठीमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यांना एकच सांगतो, अशा चौकशीच्या दबावाने नमणार नाही, घाबरणार नाही. शिवसेनेचे काम आम्ही अधिक जोमाने करू असा निर्धार आमदार वैभव नाईक व्यक्त केला.
आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील भरणी, पुंदे येथील सरपंच यांना रत्नागिरी लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघातील सुमारे चाळीस सरपंच आणि ठेकेदार एसीबीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान यावर बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर दबाव आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा चौकशीच्या दबावाला घाबरून आम्ही पळ काढणारे नाही. आता आगामी काळात शिवसेनेचे काम आम्ही अधिक जोमाने करू. दरम्यान यापुढच्या काळात अशा अनेक चौकशा आम्ही सुद्धा करू शकतो येवढं विरोधकांनी लक्षात ठेवाव असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.































































