
भाजपशासित केंद्र व घटनाबाह्य राज्य सरकारने मोठमोठय़ा घोषणा व पोकळ आश्वासने देऊन जनतेला फसवण्याचे काम केले आहे. जनतेची दिशाभूल करून आणि दुसऱयांचे पक्ष फोडून आपली पोळी भाजणे, हा एकमेव कार्यक्रम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. शिवाय भ्रष्ट व गैरमार्गाने संपत्ती गोळा केलेल्या व्यक्तींना धुतल्या तांदळासारखे स्वच्छ करणारे भाजपा एक नामांकित वॉशिंग मशीन आहे. भ्रष्टाचाऱयांनी भरलेली भाजपा पार्टी म्हणजे भामटा जगला पाहिजे पार्टी आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी केला.
हातकणंगले तालुक्यात सरकारच्या बोलघेवडय़ा योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानात त्या बोलत होत्या. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आणि माजी आमदार सुजित मिणचेकर प्रमुख उपस्थित होते. पेट्रोल-डिझेल व इंधन दरवाढीने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांना दोन वेळचे अन्नदेखील मिळणे बिकट झाले आहे. याउलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातल्या कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शिवभोजनसारखी अभिनव संकल्पना राबवली. शेतकऱयांच्या शेतमालाला दीडपट भावाची हमी देऊ सांगणारे शेतकऱयांच्या पिकाला दीडदमडीचाही भाव मिळत नसताना डोळे बंद करून गप्प आहेत. सर्वसामान्य सरकारच्या या नाकर्तेपणाला कंटाळला असून मनातल्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी ‘होऊ द्या चर्चा’तून संताप व्यक्त होत आहे, अशी भावना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, सरकारने भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी सरकारी शाळा खासगी करण्याचा घाट घातला आहे. तसेच सरकारी पदभरती कंत्राटी पद्धतीने करण्याची तयारीही सुरू केली आहे. या सरकारला धडा शिकवू, असा इशारा माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी दिला. हातकणंगले तालुक्यातील नागाव, अंबप, मनपाडळे, जुने पारगाव, नवे पारगाव, तळसंदे, वाठार, घुणकी, किणी या गावात सभा झाल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सुवर्णा धनवडे, उपतालुकाप्रमुख राजू पाटील, युवासेना तालुकाधिकारी योगेश चव्हाण, देवाशीष भोजे, शिवाजी जाधव, महेश चव्हाण, भिकाजी सावंत, अभिनंदन सोळांकुरे, संपत शिंदे, सागर डोंगरे, सागर चोपडे, लालासो यादव, ओमकार पाटील, सुभाष मोहिते, कुमार जाधव, मालती खोपडे, नारायण कुंभार, आप्पासो मोहिते, जालिंदर पाटील, अमर पाटील, सूर्यकांत पाटील यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
विक्रोळीतही फसव्या योजनांचा भंडाफोड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आदेशाने विक्रोळी स्टेशन रोड, मच्छीमार्केटमध्ये शाखा क्र. 119 वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेला सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, उपविभाग संघटक रश्मी पहुडकर, मु. ता. संपर्कप्रमुख संदेश दिघे, शाखा समन्वयक प्रशांत दास, विधानसभा संघटक परम यादव, विधानसभा संघटक मधुरा जोशी, शाखा संघटिका सावित्री कनौजिया, शाखा समन्वयक प्रशांत दास, शाखा समन्वयक संगीता पेवेकर, माजी शाखाप्रमुख राजन हांडे, म.वा.से. संघटक संदेश परब, ई.मुं.वा.से. अध्यक्षा सुनीता सागडे, शिवसैनिक प्रदीप सावंत, संतोष शिंदे, विजय सावर्डेकर, पांडुरंग पाटील, कार्यालय प्रमुख संतोष तावडे, उपशाखाप्रमुख ऍन्थोनी डिसोझा, कौस्तुभ दिघे, जितेंद्र देवरुखकर, विलास डोके, मच्छिंद्र निकम, उर्मिलकुमार शहा, अविनाश भोर, महिला उपशाखाप्रमुख शकुंतला कर्डिले, मनीषा तारळकर, प्रमिला पवार, अक्षता सावंत, बाल गोपाल मित्र मंडळातील पदाधिकारी, स्थानिक रहिवासी, गटप्रमुख व शिवसैनिक आदी उपस्थित होते.
चेंबूरमध्ये सरकारविरोधात संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. 150 आयोजित शाखाप्रमुख विशाल उगले, शाखा संघटिका कुंदा कदम, चेंबूर विधानसभेचे आमदार प्रकाश फातर्पेकर तसेच विभागातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी यांच्यावतीने पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून व विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वीर संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्वसामान्यांनी संताप व्यक्त करत असंतोषाला वाट मोकळी करून दिली.
मुलुंडमध्ये भरपावसातही सरकारविरोधात एकवटले
शिकसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुलुंड पश्चिम येथे शिवसेना शाखा क्र. 103 वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेत राज्यातील मिंधे सरकारच्या बोलघेवडय़ा योजनांचा भंडाफोड करण्यात आला. कदमपाडा, जमनादासवाडी आणि संजय गांधीनगरमध्ये झालेल्या सभेला भरपावसातही सर्वसामान्यांनी हजेरी लावून शिवसेनेच्या मोहिमेला बळकटी दिली. यावेळी उपविभागप्रमुख सीताराम खांडेकर, उपविभाग संघटक शीतल पालांडे, विधानसभा संघटक संजय माळी यांच्यासह मुलुंड विधानसभेतील सर्व आजी माजी पदाधिकारी, उपशाखाप्रमुख, उपशाखासंघटक, युवासेना आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख आनंद पवार आणि सुजाता इंगावळे यांनी केले होते.